शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी 'डंकी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच शाहरुख 'जवान'च्या शूटिंगला सुरुवात करणार असे म्हटले जात आहे. 'पठाण'नंतर शाहरुखचे तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी 'डंकी'च्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. 'डंकी' सिनेमात शाहरुखचा मजेशीर डान्सदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'टायगर 3' या सिनेमाच्या शूटिंगलादेखील शाहरुख सुरुवात करणार आहे. 'जवान' सिनेमातील शाहरुखचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमाची घोषणा केली होती.