प्लास्टिकचे शूज घालणे टाळा.
मोजे सुती कापडाचे घाला, आरोग्यास ते उत्तम ठरते.
रोज रात्री शूजमध्ये बेकिंग सोडा शिंपडा आणि सकाळी शूज स्वच्छ करा, त्यामुळे शूजची दुर्गंधी दूर होईल.
आपल्या पायाच्या घामामुळे आणि पाणी पडल्यामुळे शूज ओले होतात , त्यामुळे शूज दुसऱ्या दिवशी पूर्णपणे सुकल्याशिवाय घालू नये.
दररोज घरी आल्यावर पाय मिठाच्या पाण्यात भिजवून बसा.
वेळोवेळी शूज सूर्यप्रकाशात ठेवणे गरजेचे आहे.
रोज रात्री शूजमध्ये सायट्रस फळांच्या साली टाका त्यामुळे सकाळी शूजची दुर्गंधी कमी होईल.
खूप घट्ट शूज घालणे टाळा, त्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि पायाला घाम सुटतो.
पाय नेहमी कोरडे ठेवत जा आणि त्यानंतर त्यावर मॉयश्चरायझर लावा.
नियमित मोजे बदलत जा ,तसेच ते नियमित चांगल्या डिटर्जंटने धुवा.