शिंदे गटाचा आज आझाद मैदानावर दसरा मेळावा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. शिवसैनिकांच्या नाष्टा आणि जेवणाची सोय वाशीमध्ये करण्यात आली. नवी मुंबईतील वाशीमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाशीमधील सिडको एक्झिबिशनमध्ये ही व्यवस्था करण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडून ही व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे. शिवसैनिकांना आज स्वादिष्ट मेजवानी मिळणार आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. आझाद मैदानावरून एकनाथ शिंदे काय बोलणार हे ऐकण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात येत आहेत.