पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतयांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.



त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.



ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.



'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया दिली आहे.



संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टानं निकाल दिला.



त्यावेळी सर्वांचं लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागलं होतं.



राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टा रुमबाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला.



पण त्यावेळी संजय राऊत मात्र याबाबत गोंधळात पडले.



त्यांना काही क्षण काय झालं, हेच कळालं नाही.



मग त्यावेळी त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती दिली.