मुंबईतील सर जे जे रुग्णालयात ब्रिटीशकालीन भुयार आढळलं आहे.



हे भुयार 130 वर्ष जुनं असून ब्रिटिशांनी ते बनवलं अशी माहिती समोर येत आहे.



रुग्णालयातील डॉ. अरुण राठोड हे राऊंडवर असताना त्यांना हे भुयार दिसलं.



जे जे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला भुयारबाबत कळवणार जाणार आहे.



हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.



हे भुयार डी एम पेटिट आणि मोटली बाई या दोन्ही इमारतीला जोडणारे दोनशे मीटर लांब आहे.



मुंबईतलं सर जमशेदजी जिजीभॉय अर्थात जेजे रुग्णालय हे मुंबईतील सरकारी रुग्णालय आहे.



केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हे रुग्णालय प्रसिद्ध आहे.



देशभरातून येणाऱ्या गरीब रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय ओळखलं जातं.



सर जे जे रुग्णालयाच्या इमारती 177 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या.