शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना भवनाला सुंदर अशी रोषणाई केली आहे. शिवसेना भवनाच्या आजूबाजूला भगवे झेंडे आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बाळासाहेबांच्या जयंती निम्मित विविध कार्यक्रम शिंदे आणि ठाकरे गटाने आयोजित केले आहेत. त्याकडे सर्वच महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना भवन हे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. त्याचे एक वेगळेच महत्त्व शिवसैनिकांसाठी आहे. जयंती निमित्त अनेक शिवसैनिक सेना भवनलाही येतात त्यामुळे सुंदर अशी ही विद्युत रोषणाई केली आहे. बाळासाहेबांना अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना भवनं असं सजलंय