मोदींच्या सभेसाठी बीकेसी मैदानावर रांगोळी काढण्यात आली आहे. 50 फूट रुंद आणि 16 फूट उंच रांगोळी बीकेसी मैदानात काढण्यात आली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि भाजप-शिंदे गटाकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रदान मोदींच्या हस्ते बीकेसी मैदानात मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात येणार आहे. मोदींच्या सभेसाठी बीकेसी मैदानावर रांगोळी काढण्यात आली आहे. 50 फूट रुंद आणि 16 फूट उंच रांगोळी बीकेसी मैदानात काढण्यात आली आहे. अकरा जणांच्या टीमने रात्री 1 वाजल्यापासून रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती तब्बल नऊ तासानंतर ही रांगोळी पूर्ण झाली आहे. रांगोळी कलाकार सानिका पाटकर यांनी रांगोळी साकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.