समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
अबू आझमी यांच्या पीएला फोन करुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे.
तसेच त्यांच्या पीएला या अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ देखील केली आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत.
याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात
भादवी कलम 506 (2) आणि कलम 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.