महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह आहे. वेगवेगळ्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन केलं जातं. बीडच्या गेवराई शहरामध्ये दगड आणि चुन्यातून शिवाजी महाराजांची अतिशय रेखीव चित्ररेखा साकारण्यात आली आहे. स्वाभिमानी युवा ब्रिगेडच्या वतीने गेवराईकरांसाठी डोळ्याचे पारणे फेडणारे ही कलाकृती. हे रेखाचित्र साकारले गेवराईमधला आर्टिस्ट उद्धेश पघळ याने. हे रेखाचित्र गेवराई शहरातील आर बी अट्टल महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये साकारण्यात आला आहे. चार दिवस या कलाकाराने मेहनत घेऊन हे चित्र रेखाटले आहे..