प्रार्थना बेहेरेचा नवा अंदाज; शेअर केला बोल्ड लूक! आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. आपल्या खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय. पिवळ्या ऑऊटफिट्समधला प्रार्थनाचा हा बॉल्ड लूक चर्चेचा विषय ठरतोय. प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.