‘बिग बॉस मराठी 3’मधून घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे मीनल शहा (Meenal Shah). स्प्लिट्सव्हिला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मीनल शहा ‘मराठी बिग बॉस’मध्ये सहभागी झाली होती. मराठी बिग बॉसच्या घरात मीनल शाहचे नाव सतत चर्चेत होतंच, मात्र घराबाहेर देखील ती तितकीच चर्चेत होती. विशेष म्हणजे मीनल शाह ही अमराठी असताना देखील तिच्या मराठी बोलण्याने ती मराठीच असल्याचे वाटते. ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख मिळवणाऱ्या मीनल शहाने ‘शिवजयंती’ निमित्ताने खास मराठमोळं फोटोशूट केलं आहे. नऊवारी साडी, नाकात भरजरी नथ अशा सुंदर वेशात मीनलचं हे फोटोशूट फोटोग्राफर मयूर कोटकरने केले आहे.