मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबदमध्ये मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलंय.

यावेळी औरंगाबादमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रमुख नेेते मंडळी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबादमध्ये उपस्थित होते.

मराठवाड्याला निजामांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी शहीद झालेल्या हुत्मात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली..

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.

दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.

 त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

या कार्यक्रमाच्या नंतर शिवसेना आणि शिंदे गट या निमित्ताने आमनेसामने आले आहेत.

आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

शिवसेनेकडूनही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहण करण्यात आला