शिल्पा शेट्टीच्या गणपती बाप्पाचं तीन दिवसांनंतर विसर्जन करण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं होतं. शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापती झाली असली तरी तिनं थाटामाटात बाप्पाचं आगमन केलं. शिप्पा शेट्टीने आज गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. शिल्पाने धुमधडाक्यात बाप्पाचं विसर्जन केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोत शिल्पा व्हील चेअरवर बसलेली दिसून येत आहे. बाप्पाचं विसर्जन करताना शिल्पाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. पायाला दुखापत झालेली असताना शिल्पा डान्स करतानादेखील दिसून आली. शिल्पाच्या घरी बाप्पासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शिल्पाच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेले दिसून आले.