‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ या भूमिकेने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिला घरघरांत ओळख मिळवून दिली.


अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.



‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता अपूर्वा कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.



आता स्वतः अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर करत, आपल्या आगामी भूमिकेविषयी माहिती दिली आहे.



‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत अपूर्वा ‘राणी चेनम्मा’ यांची भूमिका साकारणार आहे.



आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अपूर्वा म्हणते की, ‘मला ही भूमिका साकारताना वैयक्तिक पातळीवर खूप मोठी नैतिक जबाबदारी वाटते. आशा करते की, मी सर्वांच्या अपेक्षांवर खरी उतरेन.’