कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहावे लागणार आहे. एबीपी न्यूजला माहिती देताना रुग्णालयाशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आधीच सुधारणा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र, डॉक्टरांनी आणखी किमान एक आठवडा खबरदारी घेत देखरेखीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लता मंगेशकर यांना आणखी एक आठवडा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. डॉ. प्रतीत समदानी यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 8-9 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते