‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल हिने आपल्या क्युटनेसने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. अभिनेत्री अनेकदा तिच्या नव्या फोटोशूटची झलक सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच शहनाजने काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये शहनाज गिलने वन शोल्डर फ्लोरल प्रिंटेड गाऊन परिधान केला आहे. या लूकमध्ये शहनाज गिल खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने आपल्या किलर लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शहनाज गिलचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो. ती अनेकदा तिचे नवीन लूकमध्ये फोटो शेअर करत असते. शहनाजचा हसरा आणि गोंडस चेहरा चाहत्यांना खूप आवडतो. शहनाज गिलने 'बिग बॉस' सीझन 13मध्ये भाग घेतला होता, त्यानंतर तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली होती.