सध्या सोशल मीडियावर शहनाज गिलची प्रचंड चर्चा आहे. शहनाज गिलने 'बिग बॉस' सीझन 13मध्ये भाग घेतला होता त्यानंतर तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 'बिग बॉस' सीझन 13मध्ये शहनाजची सिद्धार्थसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली सिद्धार्थच्या मृत्यूनंतरही चाहते दोघांनाही ‘सिदनाज’ म्हणतात शहनाजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, गेल्या वर्षी तिचा 'हौसला रख' हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले याशिवाय तिने अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत. शेहनाजचं मनमोहक हास्य सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे