अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक 'मिर्झापूर'. ही वेब सिरीज सर्वांनाच खूप आवडली. 'मिर्झापूर'मधील गोलू गुप्ताच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. गोलू गुप्ता म्हणजेच, श्वेता त्रिपाठी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव नेहमीच होत असतो. श्वेता ट्रेडिशनल लूक्ससोबतच वेस्टर्न लूक्समध्येही क्लासी दिसते. अनेक फोटोंमध्ये श्वेताचा सिझलिंग अंदाज पाहायला मिळाला आहे. आपले ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, श्वेता त्रिपाठीनं नुकतंच आपलं एक मोठं स्वप्न पूर्ण केलंय तिनं मर्सिडीज ई-क्लास एक्सक्लुझिव्ह ई 220डी कार खरेदी केलीये 'मसान'फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठीनं अभिनेता-रॅपर चैतन्य शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.