आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय

राज्यात विविध ठिकाणी रामनवमी निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

राज्यभरातील मंदिरांना रामनवमीच्या उत्सवानिमित्त आकर्षक आणि रंगीबेरंगी सजावट करण्यात आली आहे

रामनवमी निमित्त पुण्यातील देहू-आळंदीत सजावट करण्यात आली आहे

आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्री रामांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे

रंगीबेरंगी फुलांनी माऊलींचा गाभारा सजवण्यात आला आहे

मंदिराच्या सभामंडपात पाळणा उभारत रामनवमी साजरी केली जात आहे

देहूच्या संत तुकाराम महाराज मंदिरात विविध फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करत आहे