डेरी मिल्क कॅडबरीच्या जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या जाहिरातीमधील तरुणीने सर्वांचे लक्ष वेधलेय कॅडबरी गर्लचे नाव श्रेया पुजारी असे आहे. श्रेया पुजारी पुण्याची आहे. तिच्या स्माईलमुळे सध्या ती चर्चेत आहे. 24 वर्षीय श्रेया पुजारी हिच्या स्माईल आणि अदा लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. श्रेया पुजारीने पुण्यातील MIT Institute मध्ये शिक्षण घेतलेय. क्युट अशा स्माईलमुळे श्रेयाने अल्पावधीतच चाहत्यांची मने जिंकली आहेत श्रेया सध्या नवीन नॅशलन क्रश झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरायला नको. आपल्याच जाहिरातीचा बॅनर पाहिल्यानंतर श्रेयाचा आनंद गगनात मावत नव्हता.