बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घेतात. बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट



आलिया भटने प्रेगन्सीनंतर कमबॅक दमदार कमबॅक केलं. तिने वजनही घटवलं आहे.



वजन कमी करण्यासाठी आलिया भटप्रमाणे तुम्ही आहारात सूपरफुडचा समावेश करु शकता.



हर्बल टीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि चयापचय वाढवण्यास मदत करते, चरबी कमी करते. हर्बल टी तुमची भूक कमी करण्यास मदत करते.



चिकन वजन कमी करण्यासाठी चांगले आहे, कारण यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि तसेच हा प्रथिनांचा स्त्रोतदेखील आहे. यामुळे जास्त काळ पोट भरलेलं राहतं.



पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात. यामुळे पोट भरलेलं राहते, त्यामुळे तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखतं.



ज्वारी हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहार असून हा गव्हासाठी एक पौष्टिक पर्याय आहे. हे प्रथिने, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, बी जीवनसत्त्वे आणि सी यांनी भरलेले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते.



बाजरी ग्लूटेन मुक्त असून त्यामध्ये प्रथिने जास्त आहे. हे फायबरने भरलेले आहे आणि शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम आहार आहे. यामुळे चयापचय वाढून वजन कमी करण्यास मदत करते.



दूध पिणे हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे शरीराला आवश्यक प्रथिने आणि कॅल्शियम मिळतात.



क्विनोआ राजगिरा कुटुंबातील एक वनस्पती आहे. क्विनोआमध्ये भरपूर फायबर आहे आणि प्रथिने चयापचय वाढवतात, जे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेलं ठेवतात.



दही एक उत्कृष्ट फॅट बर्नर आहे. यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते, तसेच यामुळे BMI पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.