ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शर्मिली वाघीण आणि तिच्या चिमुकल्या बछड्यांच्या बाललीला कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.



ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी भागात सध्या शर्मिली आणि तिच्या तीन बछड्यांचं बस्तान आहे.



शर्मिलीची पिल्लं अवघी दोन महिन्यांची असल्यामुळे दिवसभर आईच्या दुधावरच पोट भरतात.



शर्मिलीच्या अंगावर खेळताना आणि दूध पिणारी ही चिमुकली बछडी



नाशिकच्या अनंत सरोदे या पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.



अनंत सरोदे हे गेल्या दहा वर्षांपासून ताडोबाला दरवर्षी येणाऱ्या हौशी पर्यटकांपैकी एक आहेत हे विशेष.



शर्मिली आणि तिच्या बछड्यांचा क्युटनेस सध्या वायरल होत आहे.



शर्मिली वाघीण आणि तिची चिमुकली बछडे पाहून पर्यटकांनाही आनंद झाला आहे.



वाघिणीला तिच्या बछड्यांसह पाहणं ही पर्यटकांसाठी अनोखी पर्वणीच आहे