आज आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) चांगली सुरुवात झाली आहे.
सेन्सेक्ससह निफ्टी तेजीत व्यवहार करत आहे.
भारतीय शेअर बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा चांगला परिणाम पाहायला मिळत आहे.
सेन्सेक्समध्ये 250 अंकांची वाढ होऊन तो 60 हजारांपार पोहोचला आहे
निफ्टीही 18 हजारांवर व्यवहार करत आहे
आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 289 अंकानी उसळी घेत 60550 वर उघडला
तसेच निफ्टी 82 अंकानी वाढून 18033 वर उघडल्याचं पाहायला मिळालं.
सध्या शेअर बाजारात सेन्सेक्स 317 अंकानी उसळी घेत 60578 वर आहे
आणि निफ्टी 82 अंकानी वाढून 18038 वर व्यवहार करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
निफ्टीचे एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, स्टेट बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स तेजीत आहेत