नवीन वर्षाची सुरुवात माहागाईनंच झाली आहे.

एकीकडे मंदीचे सावट, तर दुसरीकडे सोनं दिवसेंदिवस वधारत आहे.

लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील दिवसें-दिवस वाढत चालली आहे.

कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार रुपयांवर पोहोचले होतं.

आता सोन्याच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे.

28 महिन्यांचा रेकॉर्ड सोन्यानं मोडीत काढला आहे.

सध्या सोन्याचे दर 56 हजार 883 रुपयांच्या उच्चांकी दरावर पोहोचले आहेत.

सोन्यसह चांदीनंही चांगलाच भाव खाल्लाय.

चांदीचा दर 69 हजार 167 रुपयांवर पोहोचलाय

गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी उसळी झाल्याचं पाहायला मिळत आहे.