भारतीय शेअर बाजारात आत चांगली सुरुवात झाली आहे. सहा दिवस घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार आज सुरुवातीच्या सत्रात तेजी असल्याचं दिसत आहे.



आज बाजार उघडताच सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी नफ्यासह तेजीत व्यवहार करत आहेत.



आज शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच बीएसईचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 530 अंकांच्या वाढीसह 58,160 वर पोहोचला.



तर एनएसईचा (NSE) निर्देशांक निफ्टीने सुमारे 135 अंकांच्या वाढीसह 17,130 चा टप्पा ओलांडला.



आज दिवसभरातील सेन्सेक्स आणि निफ्टीच्या हालचालींवर जागतिक बाजाराचा परिणाम होऊ शकतो. विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचाही बाजाराच्या हालचालीवर परिणाम होईल.



गेले सहा दिवस बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. गुरुवारीही बाजाराची घसरणीसह सुरुवात मात्र बाजार बंद होताना या घसरणीला ब्रेक लागला.



आज सुरुवातीच्या सत्रात मेटल, आयटी, बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. INFOSYS आणि HCL TECH हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स आहेत. तर, भारती एअरटेल टॉप लूजर आहे.



आज शेअर बाजारात आयटी, बँकिंग सेक्टरचे शेअर्स तेजीत आघाडीवर आहेत. इन्फोसिसचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.



गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 25 पैशांनी मजबूत झाला. आज रुपया 82.73 वरून 82.49 प्रति डॉलरवर घसरला.



आज बाजारात इन्फोसिस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, अल्ट्रा सिमेंट, एचसीएल टेक, एल अँड टी, एचडीएफसी बँक, कोटक बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स तेजीत आहेत.



आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, पावरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, रिलायन्स, नेस्ले इंडिया, मारुती हे शेअर्सही तेजीत आहेत.



आज आयटीसी (ITC), सनफार्मा (Sunpharma), टीसीएस (TCS), भारती एअरटेल या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.