आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाने 15 महिन्यांची निचांकी पातळी गाठली आहे. मात्र, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. देशातील सर्व महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये मिळतंय. पोर्ट ब्लेअरमध्ये एक लिटर पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.