शेअर बाजाराची आजची सुरुवात सकारात्मक होती. सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने 58400 चा टप्पा पार केला आहे. निफ्टी (Nifty) देखील 17200 च्या जवळ व्यवहार करताना दिसत आहे. बँक निफ्टी (Bank Nifty) सुमारे 450 अंकांसह व्यवहार करत आहे आणि 1.12 टक्क्यांवर आहे. आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला, NSE चा निफ्टी 17,166.45 वर उघडला BSE चा सेन्सेक्स 58,268.54 वर उघडला. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत आज, 50 पैकी 46 शेअर्स निफ्टी शेअर्सच्या वाढीसह आणि फक्त 4 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात बँक निफ्टीमध्ये 442 अंकांची वाढ दिसून आली.