थोरल्या पवारांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच असल्याचं म्हणत शरद पवारांनी टीका केली आहे शरद पवार आज अकोला दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली मेळाव्यानंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आले त्यावर पवार म्हणाले,हे स्वप्न आहे,ते प्रत्यक्षात घडणार नाही प्रकाश आंबेडकरांना इ़ंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असं शरद पवार म्हणाले