राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार एकत्र दिसणार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार एकाच मंचावर येणार आहे. दौंड तालुक्यातील एका शाळेच्या नूतन वस्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघे एकाच मंचावर दिसणार आहेत. 22 ऑक्टोबरला हा कार्यक्रम असणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दुसऱ्यांदाच काका पुतण्या एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या रविवारी 22 ऑक्टोबरला अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर दिसणार आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार करणार आहेत. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित पवार आहेत.