बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. रणबीरचा 'शमशेरा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 10.25 कोटींची कमाई केली आहे. 'शमशेरा' या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसतो आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 10.25 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा बिग बजेट सिनेमा आहे. 'शमशेरा' हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे. करण मल्होत्राने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. शमशेरा चित्रपटाची कथा 1800च्या उत्तरार्धावर आधारित आहे.