अभिनेत्री शमिता शेट्टीचा 44 वा वाढदिवस आहे. शमिताला बिग बॉस 15 मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले. शमिता ही कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, ती 35 कोटी एवढ्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्याकडे मर्सिडीज बेंज ही कार आहे, या गाडीची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. तसेच तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स6 (BMW X6) ही गाडी देखील आहे. शमितानं 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बते' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.