गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात 'पठाण' (Pathaan) फिवर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानचा पठाण या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुखनं पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झाले आहेत. सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. आठव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी (1 फेब्रुवारी) पठाणनं 18 कोटींची कमाई केली आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. लवकरच हा चित्रपट 350 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 'पठाण' चित्रपटानं 55 कोटींची कमाई केली आहे. पठाण चित्रपट हा 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला आहे.