अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली स्टार किड आहे. सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. परंतु, तिची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. तिचे नवीन फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर दररोज व्हायरल होत असतात. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सुहाना खान ब्लॅक कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे. सुहाना तिच्या या ग्लॅमरस लूकमुळे खूप चर्चेत आहे. सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळेच सुहाना खानचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.