ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगनं भारतीय संघाच्या कर्णधाराबाबत मोठं भाष्य केलंय. युवा फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत हा भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होईल, असाही विश्वास रिकी पाँटिंगनं व्यक्त केलाय. आयपीएलच्या मागच्या हंगागात श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानं ऋषभ पंतकडं दिल्लीच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. ऋषभ पंतच्या नेतृ्त्वात दिल्लीच्या संघानं मागच्या हंगामात चांगली कामगिरी बजावून दाखवली होती. ऋषभ पंतनं 43 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 84 आयपीएलचे सामने खेळले आहेत. टी-20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्यानं 24.4 च्या सरासरीनं 683 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 35.2 च्या सरासरीनं त्यानं आतापर्यंत 2 हजार 498 धावा केल्या आहेत. या हंगामात दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.