बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ ‘अॅक्शन हिरो’ म्हणून ओळखला जातो. टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हीरोपंती 2’ सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘हीरोपंती 2’ सिनेमातील पहिले गाणं रिलीज झाले आहे. सध्या टायगर श्रॉफच्या चाहत्यांमध्ये 'दफा कर'ची क्रेझ आहे. ‘हीरोपंती 2’ हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'हीरोपंती'चा सीक्वल आहे. ‘हीरोपंती 2’ सिनेमात टायगर पुन्हा एकदा ‘बबलू’च्या भूमिकेत दिसणार आहे. टायगर श्रॉफसोबत या सिनेमात तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी ‘हीरोपंती 2’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. टायगरच्या ‘हीरोपंती 2’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.