स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या चाहत्यांची खूप लाडकी आई बनली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी मधुराणी आपल्या पोस्ट आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते.
नुकतेच मधुराणी प्रभुलकरने तिचे नवे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत लाडक्या आईचं सुंदर रूप पाहून चाहते देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
मधुराणीने हे खास फोटोशूट ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने केलं आहे. या सोहळ्यात सगळ्याच कलाकारांनी हटके लूक कॅरी केला होता.
पारंपारिक नऊवारी साडीसोबत शर्ट ब्लाऊज परिधान करत मधुराणीने आपल्या लूकला हटके फ्युजन टच दिला होता. सोबतच नाकातील नथ, मोकळे केस आणि पदरावरील सुंदर चित्र तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
मधुराणी प्रभुलकरचे हे सुंदर फोटो मंदार भद्रिके यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Photos : @mandarbhadrike_photography/IG)