सना कपूर 2 मार्च रोजी प्रियकर मयंक पाहवासोबत विवाह बंधनात अडकली.

या लग्नात सावत्र भाऊ अभिनेता शाहिद कपूर आणि वहिनी मीरा कपूरहीने खूप धमाल केली आहे.

या विवाहासोबतच शाहिद आणि मिराचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे

शाहिदनेही त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

शाहिद आणि पत्नी मीरा दोघेही जीभ बाहेर काढताना आणि मजेदार पोज देताना दिसत आहेत.

या जोडीचा हा फोटो खूपच क्यूट आणि फनी आहे

चाहत्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दिली आहे.

हा फोटो शेअर करत शाहिद कपूरने कॅप्शनमधून, 'कोणाची जीभ जास्त लाल आहे?'असा प्रश्न विचारला आहे.