होळीमध्ये केसांमध्ये रंग अशा प्रकारे चिकटून राहतात की ते काढल्यानंतरही बाहेर पडत नाहीत. अशा वेळी केस सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे डोक्याला खोबरेल तेल चांगले लावणे.
जर तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रमाणात तेल लावले तर ते लेप म्हणून काम करते आणि केसांचे रंगात असलेल्या रसायने आणि इतर घटकांपासून संरक्षण करते.
सर्वप्रथम केमिकलवर आधारित रंग वापरू नका. त्याऐवजी सेंद्रिय किंवा हर्बल रंग वापरा.
होळी हा असा सण आहे की, यावेळी प्रत्येकजण आनंदाने एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करत असतो.
त्यामुळे कोण रासायनिक रंग वापरत आहे किंवा कोण केमिकलचे रंग वापरत आहे हे शोधणं कठीण जातं.
हे टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे केसांना मोहरीचे तेल लावणे. मोहरीचे तेल कंडिशनिंगचेसुद्धा काम करते.
जर तुमची टाळू कोरडी असेल किंवा तुम्हाला कोंड्याची खूप तक्रार असेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.