बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता शाहरुखच्या 'जवान' या सिनेमातील लीक झालेली सीन काढून टाकण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शाहरुखला आता दिलासा मिळाला आहे. शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जवान' आणि 'डंकी'च्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी शाहरुख खान सज्ज आहे. शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.