बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाच्या माध्यमातून वरुणने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. वरुणने अभिनेता असण्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केलं आहे. गेल्या 10 वर्षांत वरुणने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. वरुण धवन 411 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. वरुण धवन वर्षभरात 20 कोटींहून अधिक कमाई करतो. एका सिनेमासाठी वरुण पाच ते दहा कोटी पैसे आकारतो. वरुणचा 'जुग जुग जिओ' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. वरुण एक जाहिरातीसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतो. वरुणच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.