मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. मानसीचा नुकताच घटस्फोट झाला असून आता तिने नवीन घरदेखील घेतलं आहे. मानसीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आयुष्यात पुढे जात असल्याचं सांगितलं आहे. मानसीने लिहिलं आहे,स्वत:च्या स्वार्थासाठी परमार्थ करत आहे. नवे रास्ते शोधण्यासाठी जुन्या वाटेने जात आहे. माझं खरं खोटं देवालाच ठाऊक आहे. म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे, असंही मानसी म्हणाली आहे. मानसीने पुढे लिहिलं आहे,मी किती निराश आहे, याची मला पर्वा नाही. पण मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मानसी नाईक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे. मानसीने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'चार दिवस सासूचे' या मालिकेच्या माध्यमातून मानसी घराघरांत पोहोचली आहे.