बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी रंगते. या पार्टीत सलमान खान देखील हजर होता. या इफ्तार पार्टीत शाहरुख खान काळ्या रंगाचा पठाणी कुर्ता परिधान केला होता. शाहरुख खान बऱ्याच काळानंतर कॅमेऱ्यासमोर दिसला. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनीही इफ्तारला हजेरी लावली. शहनाज गिल हिला देखील या इफ्तार पार्टीचं आमंत्रण होतं. झरीन खान देखील या पार्टीला हजर होती. लाल रंगाचा लहंगा परिधान करुन अदा शर्माने पार्टीला हजेरी लावली. पार्टीत जितेंद्र आव्हाड आणि सलमान खान यांची भेट झाली.