अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरत जर्सी सिनेमात झळकणार आहे. त्यापूर्वी ती सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह आहे. मागील काही दिवसांपासून नवनवीन फोटो शेअर करताना दिसत आहे. आतादेखील तिने एका ब्लॅक सूटमध्ये फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोत ती अगदी डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. मृणालच्या या फोटोंवर फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स-कमेंट्स करत आहेत. मृणाल नव्या जर्सीचं प्रमोशन देखील जोरदार करत आहे. जर्सी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता 22 एप्रिल फिक्स झाली आहे. जर्सीमध्ये हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे. मृणालचे सद्यस्थितीला इन्स्टाग्रामवर 4.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत.