बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 39 व्या दिवशीही जगभरात 'पठाण' या सिनेमाची क्रेझ कायम आहे. भारतात 532.08 कोटींची कमाई करत 'पठाण' हा सिनेमा 'नंबर 1' ठरला आहे. जगभरात 'पठाण' सिनेमाने 1,028 कोटींचा गल्ला जमवला आहे. यशराजच्या बॅनरखाली 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे. 'पठाण' सिनेमाचं शूटिंग स्पेन, यूएई, भारत, तुर्की, फ्रान्स या देशांमध्येदेखील झालं आहे. 'पठाण' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 'पठाण' या सिनेमाची निर्मिती 250 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. उत्कृष्ट दर्जाच्या वीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला पाहायला मिळत आहे.