गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना बॉलीवूडचा किंग शाहरुख खानने केलेल्या एका कृतीवरून सर्वत्र चर्चा सुरू आहे.



शाहरुखने आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुआ मागितली. यानंतर मास्क खाली करुन तो काहीतरी करताना दिसला. त्यानंतर दोन्ही हात जोडून लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली.



शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेक लोक सध्या करत आहेत. तर काही लोक त्याच्या समर्थनार्थ देखील उतरले आहेत.



अभ्यासक सांगतात, गंगा-जमुना संस्कृती हिंदू-मुस्लिम धर्माचे सौंदर्य आणि मैत्रीची तुलना भारतातील प्रमुख नद्यांशी म्हणजेच गंगा आणि यमुना यांच्या पवित्र संगमाशी करतात.



बनारसमधील हिंदू आणि मुस्लिम संस्कृती आणि जीवनशैलीचे शांततापूर्ण विलीनीकरण हे त्यांच्या मैत्रीचे प्रतीक मानले जाते.



शाहरुखने केलेल्या कृतीला ‘फुंकणे’ किंवा ‘फातिहा पढणं’असं म्हणतात.