बत्सिराई या चक्रीवादळाने मादागास्करमध्ये कहर केला आहे. वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. बत्सिराई हे दोन आठवड्यांतील दुसरे मोठे वादळ असून 235 किमी वेगाने पूर्व किनारपट्टीवर धडकले. या चक्रीवादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून किमान 10 जण ठार झाल्याची माहिती आहे. यासोबतच या चक्रीवादळामुळे सुमारे 48 हजार लोक बेघर झाले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. मादागास्करच्या हवामान विभागाने सांगितले की, पावसामुळे देशाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिंद महासागरातील महासागर द्वीपमध्ये हाहाकार माजवल्यानंतर चक्रीवादळ कमकुवत झाले.