कुंबळेनं 23 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पाकिस्तान विरोधातील कसोटी सामन्यातील एका डावात 10 विकेट्स घेतले होते.



याचा व्हिडीओही बीसीसीआयनं ट्वीट केला आहे.



वर्ष 1999... पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती.



या कसोटी सामन्यातील दुसरा सामना 4 ते 7 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत खेळवण्यात येणार होता.



टीम इंडियानं पहिल्या डावात सर्वबाद 252 धावा आणि दुसऱ्या डावात 339 धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर रचला होता.



भारतानं दिलेलं आव्हानं पेलत मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा पहिला डाव मात्र अवघ्या 172 धावांत आटोपला. तर दुसऱ्या डावात 207 धावांवर पाकिस्तानचा संघ माघारी परतला.



अनिल कुंबळेनं या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात 26.3 षटकात 74 धावा देत 10 विकेट्स घेतले.



कुंबळेनं या डावात 9 षटकं निर्धाव टाकली. हा सामना भारतीय क्रिकेट संघानं 212 धावांनी जिंकला होता.