ड्रामा क्वीन राखी सावंत आणि रितेश 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला विभक्त झाले आहेत. राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. घटस्फोटाची माहिती देत राखीने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. राखी आणि रितेश नुकतेच सलमान खानच्या बिग बॉसमध्ये दिसून आले होते. राखीला सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. राखी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो नेहमीच शेअर करत असते. 'बिग बॉस 15' हा शो संपल्यानंतर राखी अनेकदा पती रितेशसोबत स्पॉट झाली आहे. राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आजवर राखीने विविध भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.