जगाभरात कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत आहे. भारतातही कोरोना रुग्ण कमी आढळू लागले आहेत. आता राज्यातही आज 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच 9 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मुंबईत रविवारी 288 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसंच मुंबईत 532 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 2 हजार 677 सक्रिय रुग्ण रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणं कायम असल्याचं प्रशासन वारंवार सांगत आहे.