पुण्यातही शिंदे गटाचे सेनाभवन उभारलं जाणार आहे. हे कार्यालय कसं असेल यांची काही एक्सक्लुझिव्ह ग्राफिक्स एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. पुण्यातील स्वारगेट परिसरात हे सेना भवन असणार आहे. सध्या हे सेना भवन उभारण्यासाठी दिवस-रात्र काम सुरु आहे. या सेना भवनात कुठलीही कमतरता भासू नये यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तब्बल साडेचार हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेत हे कार्यालय असणार आहे. इथे कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठा हॉल, कॉन्फरन्स रुम, अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र रुम्स देखील तयार करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कार्यालय 24 तास खुलं असणार आहे. सध्या प्रचंड वेगाने या कार्यालयाचं कामकाज सुरु आहे. येत्या डिसेंबरमध्ये एक काम पूर्ण होईल असा दावा शिंदे गटाचे पुणे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेलं शिवसेना भवन मुंबईतील दादरमध्ये आहे.